पुणे,मार्च २०२६ : सेप्ट युनिव्हर्सिटीच्या तंत्रज्ञान विद्याशाखेमार्फत उपलब्ध असलेल्या ‘मास्टर्स इन बिल्डिंग एनर्जी परफॉर्मन्स (एमबीईपी)’ या दोन वर्षांच्या, पूर्ण-वेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यापीठाने अर्ज मागविले आहेत. अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.
एमबीईपी कार्यक्रम हा काटेकोर वातावरणनिर्मिती (सिम्युलेशन), प्रयोग आणि प्रणालींच्या आकलनाद्वारे ऊर्जा-कार्यक्षम इमारतींची रचना आणि हवामानाला प्रतिसाद देणाऱ्या वास्तुकलेवर केंद्रित आहे. बांधकाम व पर्यावरणार लक्ष केंद्रित करणारा हा भारतातील एकमेव कार्यक्रम आहे. हवामान आणि इमारतीच्या कार्यक्षमतेच्या आव्हानांशी संबंधित कन्सल्टिंग, संशोधन, व्यावसायिक कार्य आणि धोरण या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची इच्छा असणारे पदवीधर या एमबीईपी अभ्यासक्रमातून घडणार आहेत.
इमारतींची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे हा विषय गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून राष्ट्रीय प्राधान्याचा राहिलेला आहे. यासाठी अशा व्यावसायिकांची गरज आहे जे इमारतींमधील गुंतागुंतीचे ऊर्जा प्रवाह आणि प्रणाली समजू शकतील आणि किफायतशीर, कार्यक्षमतेवर आधारित, परवडणारे व विस्तारक्षम उपाय सुचवू शकतील. सेप्ट युनिव्हर्सिटीचा ‘मास्टर्स प्रोग्राम इन बिल्डिंग एनर्जी परफॉर्मन्स’ (एमबीईपी) हा अभ्यासक्रम ही गरज पूर्ण करतो. वास्तुकला, इमारत अभियांत्रिकी, इमारत भौतिकशास्त्र, मानवी शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांना एकत्रित करणाऱ्या एका कठोर, आंतरविद्याशाखीय शिक्षण ‘प्रयोगशाळे’द्वारे हे साध्य करण्यात येते.
हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम विविध पार्श्वभूमीच्या (वास्तुकला, स्थापत्य आणि यांत्रिक अभियांत्रिकी) विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे. याअंतर्गत वास्तविक जगातील प्रकल्प आणि एकात्मिक डिझाईन सरावांच्या माध्यमातून वाढत्या प्रमाणात कौशल्य वाढविण्यात येते. या अभ्यासक्रमाला सेप्टच्या कॅम्पसमधील अनेक अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधांचे पाठबळ लाभले आहे. त्या अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य व महत्त्वाचा भाग आहेत.
गेट परीक्षेत वैध गुण असलेले उमेदवार या कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार अर्ज करू शकतात. ज्या अर्जदारांनी ‘गेट २०२६ ‘परीक्षा दिलेली नाही किंवा ज्यांच्याकडे पात्रतेसाठीचे गुण नाहीत, त्यांच्यासाठी सेप्ट युनिव्हर्सिटीने एक पर्यायी मार्ग म्हणून सेप्ट पीजी टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येईल आणि दूरस्थपणे देता येईल. त्यामुळे सर्व भौगोलिक ठिकाणांमधील उमेदवारांना ती सहज उपलब्ध होईल.
