नागपूर, ९ जानेवारी २०२६ : भारतातील वायर आणि केबल्सचे अग्रगण्य उत्पादक आरआर काबेल कंपनीने वाढत्या तापमान आणि विद्युत ताण वाढत असणाऱ्या युगात भारतीय घरे आणि पायाभूत सुविधांच्या बदलत्या गरजांना लक्षात घेऊन अत्याधुनिक वायर सोल्युशन्सची मालिका जाहीर केली आहे. या नव्या उत्पादनांमध्ये सुपरएक्स ग्रीन एचआर+एफआर आणि फायरएक्स एलएसओएच -इबीएक्सएल या दोन वायर्सचा समावेश आहे. विविध उपयोजनांमध्ये सर्वोच्च सुरक्षितता, कार्यक्षमता आणि टिकावूपणाच्या दृष्टीने त्यांचे डिझाइन केले आहे.
“घरं अधिक स्मार्ट होत आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे वायर्स मध्ये बदल, सुधारणा करणे आवश्यक ठरत आहे,” असे आरआर काबेलचे कार्यकारी संचालक श्री. राजेश काबरा यांनी सांगितलं. “आमची ही नवीन श्रेणी फक्त आजच्या गरजा भागविण्यासाठी नाही तर जास्त तापमान, मोठ्या प्रमाणावर विद्युत लोड, अधिक सुरक्षितता आणि पर्यावरणीय जबाबदारी या उद्याच्या आव्हानांचा विचार करून त्यासाठीही तयार आहे.”
सुपरएक्स ग्रीन एचआर+एफआर वायर
प्रगत हिट गार्ड तंत्रज्ञान आणि कठोर आरइएसीएच व आरओएचएस मानकांचे पालन (२४५ हून अधिक हानिकारक रसायनांपासून मुक्त) एकत्रित करून तयार केलेली सुपरएक्स ग्रीन ही भारतातील काही मोजक्या पर्यावरणपूरक वायरपैकी एक असून सुरक्षितता आणि टिकावूपणासाठी डिझाइन केलेली आहे. ही एचआर+एफआर वायर ८५°अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकते. त्यामुळे उष्णता आणि विद्युत सुरक्षितता सुनिश्चित होते. अडवान्सड क्लास २ कंडक्टर सह डिझाइन केलेल्या या वायरमध्ये सुधारित यांत्रिक टिकाऊपणा आहे. तसेच ऊर्जेचा ऱ्हास कमी होतो. त्यामुळे ती उच्च प्रमाणात लोड घेणे आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी योग्य ठरते. उच्च वहनक्षमता मिळण्यासाठी १०० टक्के शुद्ध इलेक्ट्रोलायटिक कॉपरच्या वापराने तयार असून दीर्घकाळ टिकण्यासाठी कीटकविरोधी संरक्षण सुविधेसह येते. तिचं वैशिष्ट्यपूर्ण हरित पॅकेजिंग तिच्या पर्यावरणपूरक भूमिकेला अधोरेखित करते. सुपरएक्स ग्रीन ही फक्त वायर नाही तर कार्यक्षमतेत तडजोड न करता शाश्वततेला प्राधान्य देणाऱ्या जागरूक आणि जबाबदार नागरिकांची निवड आहे.
फायरएक्स एलएसओएच -इबीएक्सएल वायर
सर्वात कठोर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेली फायरएक्स एलएसओएच -इबीएक्सएल वायर ही साधारण पीव्हीसी वायरपेक्षा २ एक्स जास्त विद्युत लोड वाहू शकते आणि तिच्या इलेक्ट्रॉन बीम क्रॉस-लिंकिंग (इबीएक्सएल) तंत्रज्ञानामुळे तसेच लो स्मोक झिरो हॅलोजन (एलएसओएच ) इन्सुलेशनमुळे ती ९००°सी पर्यंत तापमानावर वितळत नाही.
आगीच्या घटनेत ही वायर बिनविषारी, पारदर्शक धूर सोडते. त्यामुळे सुरक्षित सुटकेसाठी मदत मिळते. तिच्या प्रगत फ्लेक्झीबल कंडक्टर डिझाईन मुळे बसवणे सोपे होते, तसेच ६० हून अधिक वर्षे टिकण्याची खात्री, अंगभूत उंदीरविरोधी आणि वाळवीपासून संरक्षण यामुळे फायरएक्स अतुलनीय सुरक्षितता आणि टिकाऊपणा प्रदान करते. ही वायर कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि अग्निसुरक्षा अत्यावश्यक असलेल्या उच्च मजल्यांच्या इमारती, स्मार्ट होम्स, रुग्णालये, हॉटेल्स आणि सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार डिझाइन केली गेली आहे.
सर्व श्रेणीतील समान मूल्य प्रस्ताव:
- उच्च तापमान सहनशीलता आणि विद्युत लोड घेऊ शकेल अशा दृष्टीने तयार
- १०० टक्के शुद्ध इलेक्ट्रोलायटिक कॉपर पासून तयार
- आयएस, आरइएसीएच, आरओएचएस, सीई, सीपीआर मानकांनुसार प्रमाणित
- उंदिरविरोधी आणि वाळवीविरोधी सुरक्षा
या नव्या उत्पादनांच्या सादरीकरणाद्वारे आरआर काबेलने विद्युत उद्योगात सुरक्षितता, टिकावूपणा आणि कार्यक्षमतेची नवी व्याख्या करण्याची आपली बांधिलकी कायम ठेवली आहे.
