नेत्रीय आरोग्याशी संबंधित उपचार पुनर्परिभाषा करणारा एक क्रांतिकारी विना-शस्त्रक्रियेचा पर्याय आता मुंबईत उपलब्ध.
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२५ : प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. निखिल नास्ता यांच्या नेतृत्वाखालील ‘आय साईट’ आयकेअर अँड सर्जरी हे महाराष्ट्रातील पहिले क्लिनिक बनले आहे, ज्याने इनमोडद्वारे एनव्हिजन सादर केले आहे. हे एक असे अभूतपूर्व तथा महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे जे कोरड्या डोळ्यांच्या मूळ कारणावर आणि पेरीऑर्बिटल (डोळ्यांखालील काळी वर्तुळे) सौंदर्यविषयक समस्यांवर उपचार करते.
अधिक स्क्रीन टाईम (टीव्ही किंवा मोबाईलचा अतिवापर), प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात डोळे कोरडे पडणे ही एक वाढती समस्या ठरत आहे. डोळ्यांमध्ये टाकण्यासाठी असलेली पारंपरिक औषधांमुळे (आय ड्रॉप्स) बहुतेकदा अल्पकालीन आराम मिळतो. एनव्हिजन नैसर्गिक अश्रू निर्मिती पुनर्संचयित करून आणि जळजळ कमी करून ही परिस्थिती बदलते.
‘एन्व्हिजन’ वेगळे काय करते
* कारणांवर उपचार करते: ‘फॉर्मा-आय’द्वारे समर्थित, अश्रू निर्मिती पुनर्संचयित करण्यासाठी ‘मेबोमियन’ ग्रंथींना सुरळीत करते.
* जळजळ लक्ष्य करते: कोरड्या डोळ्यांशी संबंधित पापण्यांची जळजळ कमी करण्यासाठी जगातील आघाडीचे ‘आयपीएल’ तंत्रज्ञान, ‘लुमेक्का-आय’चा वापर
* कायमस्वरुपी आराम: लक्षणे दूर करण्यापलीकडे उपचार.
* जलद आणि आरामदायी: १०-१२ मिनिटांचे सत्र, कोणताही व्यत्यय नाही
* सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध – जागतिक यशोगाथांद्वारे समर्थित.

डोळे आणि सौंदर्यशास्त्रातील एक जागतिक वारसा
कमीत कमी तंत्रज्ञानविरहीत उपचारांमध्ये जागतिक पातळीवर अग्रगण्य असलेले इनमोड, ‘फॉर्मा-I’, ‘लुमेक्का-I’ या सारख्या अग्रणी उपकरणांसाठी आणि डोळ्यांखालील पिशव्या, पापण्या लवचीक करण्यासाठी आणि प्रगत त्वचेच्या टवटवीतपणासाठी जागतिक स्तरावर प्रशंसित ‘फ्रॅक्शनल आरएफ मायक्रोनीडलिंग’ ( रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे सुक्ष्म सुयांचा वापर) उपचारांसाठी प्रसिद्ध आहे.
येथे उपलब्ध : आय साईट आयकेअर अँड सर्जरी, ४०२ चौथा मजला, सॅफायर बिल्डिंग, एस.व्ही. रोड, खार (पश्चिम), स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर, मुंबई-४०००५२
🌐 www.isighteyecare.com
